विहूरच्या वादग्रस्त जागेत बांधकाम

ग्रामस्थ आक्रमक: प्रशासनाला निवेदन
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विहूर मधील गट नंबर 111 या जागेत सी.आर.झेड.व एन.डी.झेड.कायदा झुगारून खुलेआम बांधकाम होत असल्याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तहसीलदार व पोलीसांना एक निवेदन सादर करण्यात आले असून जमीनधारक व विकासक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी विहूरचे माजी सरपंच रमेश दिवेकर, मुसर्रत मेहबूब उलडे, सज्जाद उलडे,इकरार मोदी, माजी उपसरपंच फैसल उलडे, माजी सदस्य मुनीर पांगारकर,प्यारा किल्लेदार,बबलू पांगारकर, ताजुद्दीन उलडे, हिलाल हलडे, गजनफर पांगारकर, सुलतान उलडे, मेहबूब उलडे, एजाज पांगारकर, हिदायत उलडे, महंमद उलडे यांसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, विहूर येथील गट नं. 111 या जागेत सी.आर.झेड.व एन.डी.झेड.कायदा झुगारून होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत अनेकवेळा ग्रामस्थांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.गुरचरण व सार्वजनिक वापर असलेल्या या जागे संबंधी प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु या अधिकृत बांधकामा विरुद्ध स्थानिक प्राधिकरण म्हणून ग्रामपंचायतीने सुद्धा संबंधितांना नोटीस पाठविली आहे. परंतु गावामध्ये सतत जाणूनबुजून जमीन धारक व विकासक कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण करत असल्याचा आरोप यामधूून ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणात ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून केवळ कागद रंगविले जात आहेत व ग्रामस्थांच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला जात आहे तसेच ग्रामस्थांनी प्रतिकार केल्यास त्यांचे विरुद्ध राजकीय दबाव तंत्र वापरून पोलीस कारवाई होईल. अशी परिस्थिती निर्माण केली जाते. आणि असे यापूर्वी घडले आहे. गट नंबर 111 मधील दैनंदिन कब्रस्तान, दर्गा अशा धार्मिक व सार्वजनिक पाण्याची विहीर वापर करत असलेल्या ग्रामस्थां विरुद्ध पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. असेही सुचित करण्यात आले आहे.


चौकशी समितीकडून पाहणी
मागील काळात अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी यांनी एक समिती नेमून परिस्थितीची पाहणी केली व समितीने दिलेल्या अहवालानुसार या ठिकाणी नं. 111 लगत समुद्रातील कांदळवन तोडण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मातीचे ढीग, खोदकाम, दगड, खडी व क्रश सेंड व आर. सी.सी कॉलम आढळले आहे. याच कारणामुळे गावात संघर्षाची परिस्थिती निर्माण करून राजकारण तर केले जात नाही ना ? अशी सर्वत्र चर्चा आहे.

माजी मंत्री अनिल परब यांच्या कथित सीआरझेड क्षेत्रात झालेले बांधकाम प्रकरण अख्या महराष्ट्रात गाजत आहे परंतु त्यासमान विहूर या ठिकाणी होत असलेले उठन व छऊन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार या ज्वलंत प्रश्‍नांंकडे दुर्लक्ष का करीत आहेत,असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

रजकीय पोळी भाजण्यासाठी विहूर गावाला संघर्षाच्या खाईत टाकले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तरी पुढील काळात स्फोटक परिस्थिती होऊ नये. याकरिता या विकासकाविरुद्ध व धारकाविरुद्ध फौजदारी कारवाई करावी. – रमेश दिवेकर,विहूरचे माजी सरपंच


Exit mobile version