इनरव्हील स्पर्धेत प्राची चौडीएचे यश

| कर्जत । वार्ताहर ।
इनरव्हील क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट-313 ची 38 वी डिस्ट्रिक्ट आय एस ओ व एडिटर मीट-2022 या स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या, या स्पर्धेत इनरव्हील क्लब कर्जतच्या आयएसओ प्राची चौडिए यांनी उज्वल यश संपादित केले आहे.

पुणे बाणेर येथे माऊली गार्डन येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ब्राइड्स ऑफ इंडिया, नृत्य नाटिका, सुरीली आय एस ओ.अशा तीन स्पर्धा होत्या, नृत्य नाटिका, सुरीली यामध्ये चौडीए यांनी ब्राइड्स ऑफ इंडिया या स्पर्धेत भाग घेऊन दुसरे पारितोषिक मिळवले. त्यांनी बंगाली ब्राईड हा वेश परिधान केला होता. इंद्राणी म्हणजे एडिटरसाठी वंडर लेडीज आणि क्रिएटिव्ह ड्रेस या दोन स्पर्धा त्यात ज्योत्स्ना शिंदे यांनी वंडर लेडीजमध्ये भाग घेऊन मॉरिशसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या. यावेळी मुक्ती पानसे, उत्तरा वैद्य, अवंतिका गायकर, शीला गुप्ता, अ‍ॅड.संजीवनी घुमरे, रूपा खणाल उपस्थित होत्या.

Exit mobile version