| म्हसळा | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हसळा उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप किशनराव पटवारी (दि.28) मार्च नियतकाल वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. महावितरण कार्यालयाकडून त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पाच गाव आगरी समाज सभागृहात कार्यकारी अभियंता पाटील यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, प्रदीप पटवारी यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकारी विजय पटवारी यांनी महावितरण कंपनीत तब्बल 33 वर्षे विविध ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. सत्कार समारंभ कार्यक्रमास पत्रकार संजय खांबेटे, उद्योजक योगेश करडे, श्री व सौ निरनेसर, उमाकांत गुंडरे, प्राध्यापक शिसोदे, अभियंता नितीन पाटील, डॉ. रमेश भुगे, विभागीय कार्यालयाचे सर्व लाईनमन, कार्यालयीन कर्मचारी, मीटर वाचक सदस्य आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचलन अभियंता राहुल यांनी केले, तर प्रास्ताविक मेंदडी विभागाच्या अभियंता पल्लवी तोडकर यांनी केले.