प्रकाश ठोंबरे यांचा वाढदिवसदिनी 42 किलोमीटरची दौड

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पोही गावचे प्रकाश ठोंबरे यांनी आपल्या 40 व्या वाढदिवसाच्या दिवशी फुल मॅरेथॉनसारखे सलग 42 किलोमीटर धावण्याच्या विक्रम केला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, नेरळ गावात सध्या वास्तव्य असलेले ठोंबरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
मालवण नगर पंचायत आयोजित तारकर्ली देवबाग कोस्टल मेरोथॉन 2022 या स्पर्धेअंतर्गत कर्जत तालुक्यातील वारे-पोही गावचे प्रकाश गणपत ठोंबरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. 28 जून रोजी सकाळी 8 वाजल्या पासून नेरळ येथून धावण्यास सुरुवात केली.
नेरळ -कशेले मार्गे सुरवात करून कर्जत मुरबाड महामार्गावरुन सलग कर्जतपर्यंत अंतर पार केले. परतीच्या वेळी कर्जत कल्याण महामार्गावर सलगपणे नेरळपर्यंतचा सुमारे 42 किलोमीटरचा पल्ला 4 तास 58 मिनिटे इतक्या वेळेत गाठून मॅरेथॉनमध्ये विक्रम केले.प्रकाश याने यापूर्वी ही विविध मरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यात महाबळेश्‍वर मेरोथॉन 21 किलोमीटर, मालवण मेरोथॉन, 32 किलोमीटर, अवसरे ते सिद्धगड नाईटरन 32 किलोमीटर, ठाणे मेरोथॉन 5 किलोमीटर, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट स्पर्धा 21 किलोमीटर ,नेचर ट्रायल 21 किलोमीटर,बदलापूर मेरोथॉन इत्यादी स्पर्धेत भाग घेत आपली आवड जपत यश संपादन केले आहे,त्याच्या या साहसी कृत्याचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version