। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब जवळील पोही गावातील रहिवाशी असलेले प्रकाश ठोंबरे हे सतत वेगवेगळ्या प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत असतात. काही दिवसांपूर्वी लोणावळा येथील अत्यंत खडतर समजली जाणारी 50 किलोमीटर लांबीचा मॅरेथॉन पार करण्यात प्रकाश ठोंबरे यशस्वी झाले आहेत. राज्यातील वेगवेगळया ठिकाणी जाऊन मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणारे प्रकाश ठोंबरे यांचे कौतुक होत आहे.
प्रकाश ठोंबरे हे आघाडीचे धावपटू समजले जातात. वयाच्या 15 वर्षांपासून वेगवेगळ्या अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत असून नुकतेच त्यांनी लोणावळा येथील 50 किलोमीटर लांबीची मॅरेथॉन स्पर्धा अल्प वेळेत पूर्ण केली आहे.लोणावळा येथील हि मॅरेथॉन स्पर्धा धावपटूंसाठी खडतर समजली जाते. हि 50 किलोमीटर लांबीची मॅरेथॉन स्पर्धा प्रकाश ठोंबरे यांनी सहा तास 21 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण केली.डोंगराळ भागातून जाताना धावपटू हे तेथील चढ उत्तर आणि डोंगराळ भागातून प्रवास असल्याने खडतर समजली जात होती.
प्रकाश ठोंबरे यांनी आतापर्यंत अनेक धावण्याच्या स्पर्धा यशस्वीपणे पार केल्या आहेत.मागील वर्षी टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील 42 किलोमीटरचे अंतर त्यांनी पाच तास 22 मिनिटात पूर्ण केली होती. देशाच्या सीमेवर लढणार्या शूर सैनिक यांच्यासाठी आयोजित होणारी 65 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा तब्बल तीनवेळा पूर्ण केली आहे.40 किलोमीटर लांबीची हाफ मॅरेथॉन स्पर्धा प्रकाश ठोंबरे यांनी पूर्ण केली आहे. त्याचवेळी कल्याण, ठाणे, डोंबिवली, मुंबई, मालवण, सातारा तसेच महाबळेश्वर आणि वसई विरार येथील हाल्फ मॅरेथॉन प्रकाश ठोंबरे यांनी पूर्ण केली आहे.स्वतःच्या 42व्या जन्मदिवशी 42 किलोमीटर अंतर पार करण्याचे उद्दिष्टदेखील त्यांनी पूर्ण केली आहे. 10 किलोमीटर लांबीची हाल मॅरेथॉन प्रकाश ठोंबरे यांनी तब्बल 25 वेळा पूर्ण केली असून यावर्षी प्रजसत्ताक दिनी 20 किलोमीटर अंतर धावून हे अंतर पूर्ण केले आहे. तर सायकलद्वारे देखील अनेक किलोमीटर अंतर त्यांनी रायगड, नाशिक, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात भटकंती केली आहे.