महावितरण कार्यालयात प्रकाशदूतांचा सत्कार

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग येथील महावितरणच्या कार्यालयात (दि.4) मार्च रोजी लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. स्वतःचे जीव धोक्यात घालुन घरा-घरामध्ये प्रकाश देण्याचे अविरत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी लाईनमन बांधवांचा प्रकाशदूत म्हणुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महावितरणचे अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांनी भूषाविले व प्रमुख अतिथी म्हणून अभि सांगळे, अभियंता श्रीपाद कुलकर्णी तसेच उपव्यवस्थापक प्रकाश माने व महेश म्हात्रे उपस्थित होते.

विजेची बचत आणि विजेसंबंधी आवश्यक असलेली सुरक्षितता यावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विजेसंबंधी दैनंदीन काम करताना सुरक्षा साधनांचा कटाक्षाने वापर करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अलिबाग प्रशांत बानाईत, अभियंता विशाल सूर्यवंशी, अभियंता वैशाली दांडेकर, अभियंता सोनाली सपकाळ, अभियंता प्रकाश सत्वे, अभियंता वैभव डफळ, अभियंता तेजस खाले, अभियंता देववृत्त पवार, अभियंता दिनेश चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version