प्रमोद दळवी सेवानिवृत्त

| तळा | वार्ताहर |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तळा शाखाधिकारी प्रमोद पुरुष परशुराम दळवी यांचा सेवा निवृत कार्यक्रम तसेच विशेष कार्य करणार्‍यांचा सन्मान तळा शाखा कार्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे माजी संचालक आणि शेकापक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद भोईर होते. दळवी यांनी 33 वर्षे बँकेत सेवा केली असून वयाच्या 60 व्या वर्षी ते सेवा निवृत झाले आहेत. त्यांनी रोहा, खोपोली, उरण, माणगाव आणि तळा येथे उत्तम काम केले. यामध्ये 10 वर्षे वसुली अधिकारी तर 23 बँक मॅनेजर म्हणून काम केले. तळा शाखेत काम करीत असताना जवळपास 150 बचत गटांमर्फत 225 सेविंग खाती सुरू करून अंदाजे 3000 हजार खातेदार निर्माण केले.

यावेळी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणार्‍याचा सत्कार करण्यात आला. त्यात पुरुषोत्तम मुळे, दिलीप ढाकणे, वंदन सापळे. समीर रातवडकर भारती शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरी घोलप, चंद्रकांत रोडे, गोविंद भोईर, किरण देशमुख, सौ घाग, श्री मिरगळ, सेवानिवृत्त सैनिक श्री. घाग, माणगाव, निजामपूर, रोहा बँक कर्मचारी बारटक्के, देशमुख, जंगम, कडू, दिपाली दळवी, सनेहा दळवी, एन एच मुतंगे, शशिकांत म्हात्रे, उल्हास उपाध्ये, धवल टिळक, दर्शना चोरगे-भोईर, अविनाश नाक्ती, प्रकाश मेकडे, नंदकुमार खांडके, निशांत मुद्राळे, बँकेचे खातेदार, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version