लायन्स क्लब पोयनाडच्या अध्यक्षपदी प्रमोद राऊत

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब ऑफ पोयनाड यांच्या नूतन कार्यकारिणाचा 2023-24 करिताचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात लायन्स क्लब ऑफ पोयनाडचे नूतन अध्यक्ष प्रमोद राऊत यांनी पदग्रहण करुन पदाची सूत्रे घेतली. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले.

लायन्स क्लब पोयनाडचा पदग्रहण समारंभ पोयनाड येथील अशोका लॉन्स ॲण्ड रिसॉर्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या पदग्रहण व शपथविधी समारंभासाठी इंस्टॉलेशन ऑफिसर म्हणून एमजेएफ मुकेश तनेजा, तर इंडक्शन ऑफिसर म्हणून एमजेएफ प्रवीण सरनाईक, रिजन चेअरपर्सन प्रियदर्शिनी पाटील, झोन चेअरपर्सन विजय वनगे यांच्यासह व्यासपीठावर लायन्स क्लब पोयनाडचे मावळते अध्यक्ष विकास पाटील, ओमकार जोशी, कौस्तुभ जोशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष प्रमोद राऊत, उपाध्यक्ष विनेोद पाटील, सचिव ओमकार जोशी, खजिनदार प्रगती सिनकर, निलम माळी, तसेच मनोज जैन, रामचंद्र कामठे, प्रदीप सिनकर, कौस्तुभ जोशी, मनीष अग्रवाल, प्रमोद पाटील या पदाधिकाऱ्यांसह विकास पाटील, अरविंद अग्रवाल, महेंद्र पाटील, दिलीप गाटे, सतीश पाटील, मनोहर चवरकर यांनी कार्यकारिणी संचालक म्हणून यांनी शपथ घेतली. तर मनोज जैन, प्रदीप जैन, सुनील काकडे, सचिन परिहार, नेहल जोशी, महेंद्र प्रजापती, रत्नकांत सूर्यवंशी या नवीन सात सदस्यांचा शपथविधी झाला.

प्रारंभी मावळते अध्यक्ष विकास पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच पाहुण्यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रगती सिनकर यांनी ईशस्तवन सादर केले. या कार्यक्रमासाठी फ्रांसहून युथ एक्स्चेंजच्या चेअरपर्सन इसाबेल, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी हे खास उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष अभिजीत गुरव, सुबोध राऊत, अमिश शिरगावकर, जितेंद्र ठाकूर, मोहन पाटील, विद्या अधिकारी, अनिल म्हात्रे, तसेच लायन्स क्लब अलिबागचे नयन कवळे आदींचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निवेदन प्रगती सिनकर, मनोहर चवरकर, प्रियांका राऊत यांनी केले, तर आभार ओमकार जोशी यांनी मानले.

Exit mobile version