। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी प्रशांत कोरटकर याला अखेर कोल्हापूर सत्र न्यायालायने जामीन मंजूर केला. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून शुक्रवारी (दि. 11) सुटका करण्यात आली आहे. तसेच, प्रशांत कोरटकरवर कोर्टाबाहेर दोन वेळा हल्ला करण्यात आला होता, या पार्श्वभूमीवर जेलबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याला पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.