। खोपोली । प्रतिनीधी ।
मुबंई-पुणे जुन्या महामार्गांवर बोरघाटात खिंडीत डिझेल वाहून नेणाऱ्या पिकअप टँकरचा ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुबंई-पुणे जुन्या महामार्गावरून पिकअप टँकर (आरजे 14 जीएल 4066) घेऊन चालक हुकूमसिंग कुंदन राठोड (32) हे पुण्याहून खोपोलीकडे बोरघाटातून येत होते. दरम्यान, बोरघाटात खिंडीत आले असता टॅंकरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर खिंडीच्या डोंगरावर धडकला आणि पलटी झाला. या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडून मोठे नुकसान झाले.