प्रशांत ठाकूर आमदार म्हणून अपयशी

। पनवेल । प्रतिनिधी ।

सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्यावर देखील मतदार संघाचा विकास करण्यासाठी अपयशी ठरल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.

2009 साली पहिल्यांदाच आमदारकिची निवडणूक लढणार्‍या प्रशांत ठाकूर यांनी मतदारांवर आश्‍वासनांची खैरात केली होती. ठाकूर यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेऊन मतदारांनी देखील ठाकूर यांना आमदारकीची संधी दिली होती. मात्र, या संधीच सोनं न करता आल्याने भाजपच्या लाटेवर स्वार होत ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर दुसर्‍यांदा आणि तिसर्‍यांदा आमदारकी मिळवली आहे. मात्र, तीनवेळा निवडून येऊन देखील मतदार संघात विकास कामे करण्यात ठाकूर यांना अपयश आले आहे.

पनवेल मतदार संघातील एसटी आगाराचा विकास अनेक वर्ष राखडला आहे. त्याचप्रमाणे आ. ठाकूर यांनी श्रेय घेतलेल्या शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणं पुलाचे काम अद्यापही अपूर्ण स्थतीत आहे. तसेच, येथील प्रशासकीय भवन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अपूर्ण इमारत, अपुर्‍या वैद्यकीय सुविधा, खड्डे पडलेले रस्ते, अपुरा पाणी पुरवठा, कारखान्यातून होणारे प्रदूषण, फेरीवाल्यांचा विळखा, पालिका आकारात असलेला मालमत्ता कर यावरून मतदारांमध्ये आ. ठाकूर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. आणि ही नाराजी 20 नोव्हेंबरच्या दिवशी मतपेट्यातुन पाहायला मिळणार असल्याचे मत मतदार व्यक्त करत आहेत.

प्रकल्पग्रस्ताची नाराजी भोवणार
नैना, मुंबई ऊर्जा प्रकल्प तसेच सिडको विरोधात पनवेल विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करताना ग्रामस्थांच्यावतीने अनेकदा आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र, या आंदोलनांना आ. ठाकूर यांनी कायम पाठ दाखवली असल्याने प्रकल्प ग्रस्तांनमध्ये आ. ठाकूर यांच्या विरोधात नाराजी आहे.
Exit mobile version