प्रतीक जुईकर यांचा शिक्षकांकडून सत्कार

। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस अधिकारी बनलेले प्रतीक चंद्रशेखर जुईकर यांचा जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जुईकर यांचे वडील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असून त्यांच्या सहकार्‍यांचे वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या नेरळ केंद्राच्या वतीने जुम्मापट्टी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी प्रतीक जुईकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नेरळ केंद्रातील शिक्षक आणि कन्या शाळेचे मुख्याध्यापक भास्कर थोरवे यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि नेरळ केंद्रातील निवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्जत तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला नेरळ केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी धराडे, मुख्याध्यापिका गीता पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.

Exit mobile version