दीपावलीसाठी तयार किल्ल्यांना पसंती

350 ते 1600 रूपयांपर्यंत बाजारात विक्री
अलिबाग । वार्ताहर ।
दीपावली सण अवघ्या एक आठवड्यावर आला आहे. घराघरातील महिला फराळ बनवण्यात व्यस्त आहेत तर बच्चे कंपनीही किल्ले बनवायच्या तयारीला लागली आहे. मात्र शहरातून माती मिळणे अवघड होत आहे. याचाच फायदा घेऊन पीओपीचे किल्ले बनवून विक्रीस आले आहेत.
सध्या बाजारात 350 ते 1600 रूपयांपर्यंत हे किल्ले विकत मिळत आहेत. तसेच किल्ल्यावर ठेवले जाणारे मावळे, सैनिक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा विक्रीस आलेले आहेत. मात्र तयार किल्ल्यामुळे आनंद काहीसा कमी झाला आहे. ग्रामीण भागात आजही सायकलच्या कॅरिअरवरून माती आणून किल्ले बनविले जातात. तसेच किल्ल्यांसाठी स्पर्धाही होतात. मात्र यंदा तयार किल्ल्यांना पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
माती आणून किल्ला बनविण्याचा आनंद काही वेगळाच असायचा. किल्ल्यावर हळीव किंवा मोहरीचे बी टाकून नैसर्गिक झाडी दाखविण्याचा प्रयत्न केला जायचा. मात्र बाजारात विक्रीला आलेल्या किल्ल्यांमुळे लहानग्यांचा तो आनंद घेता येणार नाही.

Exit mobile version