। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील एका महिलेवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती गर्भवती राहिल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
या घटनेतील पिडीता ही महाड तालुक्यातील सांदोशी येथील रहिवासी आहे. जून महिन्याच्या कालावधीत पिडीता परिसरातील रस्त्यालगतच्या झाडीझुडूपात जात असताना आरोपीने तिची मुस्कटदाबी केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यामनाविरूद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारामुळे तिला गर्भधारणा झाली असून, सद्यःस्थितीत पिडीता पाच महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी पिडीतेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाखल गुन्ह्यानुसार घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी.अवसरमोल करीत आहेत.
लैंगिक अत्याचारामुळे गर्भधारणा
