समाजसेवेचा वारसा जपा- विसपुते

| पनवेल | वार्ताहर |

आपल्या देशाला खूप मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाप्रती, आजच्या तरुणपिढीने समाजसेवेचा वारसा नि:स्वार्थपणाने जपला पाहिजे, असे आवाहन आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी तारा येथे केले.

नवीन पनवेल येथील बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या दोन दिवसीय समाजसेवा शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी युसुफ मेहर अली सेंटर तारा येथे झालेल्या समारंभप्रसंगी धनराज विसपुते बोलत होते.

समारंभास इनफिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष आयुफ अकोला, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, पत्रकार लक्ष्मण ठाकूर, युसुफ मेहर अली सेंटरचे देविदास पाटील, बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. अ‍ॅड. सीमा कांबळे, राजेंद्र कारंजकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविक विनायक लोहार यांनी केले. दोन दिवसीय शिबिराविषयी प्रा. विजय मोरे, प्रा. अमिना शेख, विद्यार्थिनी प्रियंका शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या समाजसेवा शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थितांचे आभार प्रा. नेहा मात्रे यांनी मानले.

Exit mobile version