| भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील आंबेपूर-पेझारी येथील श्रीपंत भक्तमंडळ संचलित, गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान तर्फे गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या 40 व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार दि.19 एप्रिल 2022रोजी भव्यसन्मान सोहळा 2022 चे श्री दत्त मंदीर पेझारी येथे आयोजन करण्यात आले. सदर सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा आणि सामाजिक संस्थाना सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात सर्वोत्तम उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल लक्ष्मी नगर सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ आंबेपूर पेझारी या सस्थेला मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य सुभानराव राणे सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.
लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते .महाड येथील गरजू पूरग्रस्तांना प्रत्यक्ष जाऊन मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.लायन्स क्लब पोयनाड यांचे सोबतीने रक्तदान उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. असे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.मंडळाचे अध्यक्ष लिलाधर धुमाळ आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळातील सर्व महिला अतिशय हिरिरीने सहभागी होऊन सामाजिक कार्यांत सामाजिक बांधिलकी जपत आहेत. सदर सोहळ्यात रा.जि.प सदस्य तथा झेप फाऊंडेशनच्याअध्यक्ष चित्रा पाटील, श्री पंत भक्त मंडळ पेझारीचे अध्यक्ष दिगंबर सुभानराव राणे, शहाबाजकर बुवा, कारेकर बुवा, पंत बाळेकुंद्री महाराज सांप्रदायातील अध्यात्मीक वारसा असलेले भक्त मंडळी उपस्थित होते.