| माणगाव | वार्ताहर |
अलिबाग शिक्षक पतसंस्थेच्या मुख्य शाखेत संचालकांची मासिक सभा रविवार 1 आक्टोबर रोजी अलिबाग येथे संपन्न झाली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी आ.जयंत पाटील आणि व्हा.चेअरमनपदी सुरेश खैरे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. अलिबाग शिक्षक पतसंस्थेने यापूर्वीच कोर बँकिंग सुविधा सुरू केली आहे. सभासदांच्या वेतनातून संस्थेचे दरमहा होणारे कर्जाची कपात व शेअर्स रक्कम गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संस्थेला चेकद्वारे रक्कम प्राप्त होत होती मात्र महाराष्ट्र शासनाने शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे सुरू केली आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने यापुढे इसीएस प्रणाली द्वारे सभासदाच्या बँक खात्यातून कर्ज रक्कम ऑनलाइन पद्धतीने वजा होणार आहे. यामुळे कोणताही मानसिक त्रास मुख्याध्यापक व सभासद यांना होणार नाही. जिल्ह्यात इसीएस ऑनलाईन बँकिंग सुविधा पुरवणारी पहिली पतसंस्था ठरली आहे. याबद्दल संचालक मंडळाचे व कर्मचारी वर्गाचे सर्व स्तरातून व सभासदांकडून कौतुक होत आहे.







