अलिबाग, वार्ताहर
वेश्वी-गोंधळपाडा येथील पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयातील सभागृहात रविवार दि.13 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीची सभा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस संघाचे संस्थापक अध्यक्ष अ.प्र.देशमुख, उपाध्यक्ष अ.पां. म्हात्रे, बळवंत वालेकर, कार्यवाह एस.एम.पाटील, खजिनदार चंद्रकांत नवगिरे, उपकोषागार अधिकारी उद्धव जोशी, पुरुषोत्तम साठे, उल्हास ठाकूर, अजय पाटील, आर.एन.पाटील, प्रकाश खरसंबळे, संजीवनी जोशी,ज्योत्सना चौगुले उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यवाह एस.एम.पाटील यांनी केले. सर्वप्रथम संघाच्या 3 सप्टेंबर रोजी पी.एन.पी.महाविद्यालय,वेश्वी-गोंधळपाडा येथील नियोजित जिल्हा मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी संघाच्या 75 वर्षांपुढील सर्व ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील दिर्घायुष्यासाठी शुभचिंतन करण्याचे ठरले. संघाच्या जम-खर्चाचे वाचन नवगिरे यांनी केले.
यावेळी निवृत्त उप कोषागार अधिकारी उद्धव जोशी यांनी पेंशन केस संबंधी उद्भवणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण केले. तर अ.प्र.देशमुख, बळवंत वालेकर, पी.डी.साठे, अ.पा.म्हत्रे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. श्रीकांत पाटील यांनी संघ स्थापनेची आवश्यकता,राज्य संघाचे कामकाज, भविष्यकालीन योजना इत्यादीवर भाष्य करुन उल्हास ठाकूर यांनी आभार मानून सभेची सांगता झाली.







