झिराड येथील आपल्या फार्महाऊसची केली पाहणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
क्रिकेटपटू विराट कोहली आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलिबाग झिराड येथील आपल्या फार्महाऊसची पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
रविवारी (दि.13) विराट आणि अनुष्काने आपल्या फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी याच सुमारास अलिबागमधील झिराड येथे 8 एकर जमिनी खरेदी केली होती. या जागेवर सुमारे 20 हजार चौरस फूटाचे ड्रिमफार्म हाऊसचे बांधण्याचे काम सुरु आहे. या फार्म हाऊसचे डिझाइन विख्यात वास्तुविशारद मुझुमदार ब्राव्हो यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून समजते. त्यामुळे हे फार्महाऊस अतिशय अलिशान आणि देखणे होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.