तालुका चिटणीस किशोर पाटील यांचे प्रतिपादन
| खोपोली | प्रतिनिधी |
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि खोपोली पालिकेची निवडणुक शेतकरी कामगार पक्ष मोठ्या ताकदीने लढणार आहे. सध्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तरूण, सुशिक्षित, सुसंकृत तरूणांना निवडणुकीत प्राधान्य देणार आहोत. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यानुसार आघाडीसोबत चर्चा करून जागा वाटप करू, अशी माहिती खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी दिली. तसेच, जिल्हा परिषदेच्या सत्तेत शेतकरी कामगार पक्ष असेल, असा दावा देखील किशोर पाटील यांनी केला आहे. नुकतीच खालापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेकापच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
सध्या जिल्ह्याला आगामी निवडूकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेकापच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीला रामभाई देशमुख, संतोष पाटील, भाई ओव्हाळ, खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष अरूण पुरी, कैलास गायकवाड, रवि रोकडे, खोपोली शहर खजिनदार जयंत पाठक, अबूबकर जळगावकर, भूषण कडव, प्रवीण लाले, गुरूनाथ साठेलकर, किसन विचारे, रमेश दळवी, द्वारकानाथ गावडे, हरिश्चंद्र कडपे, मधुकर तवले, दिपक कानकर, खंडू पाटील, परशुराम पाटील, अरुण पाटील, अनंत पाटील, धनाजी कुरंगळे, मिलिंद मुंडे, अनिल कुरंगळे यांच्यासह खालापूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खालापूर तालुक्यातील 4 जिल्हापरिषद गट आणि 8 पंचायत समिती गण आहेत. तसचे, चौक जि.प. गटातून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी नकार दिला असला तरी पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. आत्करगांव आणि खानाव पंचायत समिती गणात आमचे उमेदवार तयार आहेत. तसेच, खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असल्याचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी सांगीतले. तसेच, बैठकीत कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या समस्या पक्षश्रेष्ठींकडे पोहचवणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.







