ताम्हिणी घाटात खासगी बसला अपघात;  17 प्रवासी जखमी 

| माणगांव | सलीम शेख |

पुणे ते माणगाव दरम्यान ताम्हिणी घाटात मध्यरात्री खासगी प्रवासी बस ला अपघात होऊन या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री पुण्याहून चिपळूणकडे निघालेल्या बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हिणी घाटात अपघात झाला. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला पलटली. अपघाताची माहीती मिळताच माणगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जखमींची नावे
स्वस्ति गायकवाड, साची गायकवाड, स्वामिनी गायकवाड, यश यादव, दक्ष गायकवाड, विक्रम गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, भावना यादव, आदेश गायकवाड, उर्मिला गायकवाड, रजनी गायकवाड, गणेश गुंजाळ, स्मिता झोंबरे, प्रविण झोंबरे, सुजल झोंबरे, समिक्षा झोंबरे, मेघा जाधव
Exit mobile version