प्रियांका गांधींना पोलिसांनी रोखले

। आग्रा । वृत्तसंस्था ।
पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी येणार्‍या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वधेरा यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवर रोखून धरले यामुळे एक्सप्रेस वेजवळ पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत धुमश्‍चक्रीही झाली.आग्र्याच्या जगदीशपुरा भागात कथितरित्या पोलीस कोठडीत एकाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. या व्यक्तीचं नाव अरुण वाल्मिकी होतं.

17 ऑक्टोबर रोजी एका संस्थेत 25 लाख रुपयांच्या चोरीचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी सफाई कर्मचारी असलेल्या अरुण वाल्मिकी याला ताजगंज भागातून ताब्यात घेतलं होतं. चोरीच्या घटनेनंतर अरुण फरार होता. बुधवारी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. परंतु, आज सकाळी वाल्मिकीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Exit mobile version