। म्हसळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद शाळा खारगाव बुद्रुक येथे दि. 19 व 20 डिसेंबर दरम्यान पाभरे केंद्राच्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लंगडी, लगोरी, बेचकीने नेम धरणे तसेच समूह गायन, समूह नृत्य व दोरी उडी या क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. केंद्रातील विविध शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले व पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी पाभरे केंद्राचे केंद्रप्रमुख भानुदास राठोड, मुख्याध्यापक अण्णासाहेब बिचुकले तसेच केंद्रातील सर्व शाळेंचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
