| पाली । वार्ताहर ।
दि प्राइड इंडियाच्या वतीने व महानगर गॅस लि. यांच्या सहकार्याने पाली येथील क्रीडा संकुल येथे एक दिवसीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सुधागड पालीचे गट विकास अधिकारी अशोक महामुनी, गटशिक्षणाधिकारी सादूराम बांगारे, पो. नि. विश्वजीत कांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुलांच्या कब्बडी स्पर्धेत अडुळसे संघाने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक भार्जे या संघाने पटकावले. मुलींच्या लंगडी स्पर्धेत चिखलगाव संघाने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक आपटवणे संघाने पटकावले. तसेच इतर खेळांमध्ये उत्कृष्ट उत्कृष्ट खेळीने मुलामुलींनी क्रमांक पटकावले या सर्व विजेत्यांना पाली न.पं.चे प्रभारी नगराध्यक्ष आरिफ मणियार, संदेश शेवाळे, सुमित खैरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.