| कर्जत । वार्ताहर।
कर्जत तालुका फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद कर्जतमधील मॉर्निंग स्टार क्रिकेट संघाने जिंकले उपविजेतेपद खालापूरच्या धाकटी पांढरी क्रिकेट संघाने जिंकले. या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता.
तालुका फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मालवाडी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत मालिकावीर म्हणुन मॉर्निंग स्टार संघाचा प्रभाकर देशमुख, उत्कृष्ट फलंदाज म्हणून धाकटी पंढरी संघाचा प्रविण देशमुख, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून धाकटी पंढरी संघाचा रमेश ठोंबरे व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मॉर्निंग स्टार संघाचा बाळा धनवे यांची निवड करण्यात आली.पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी संघटनेचे शशांक शेट्टी, दिनेश कडू, श्रीकांत मनोरे, विश्वनाथ थोरवे, राहुल वैद्य, श्रावणी मनोरे, प्रवीण गांगल, मधुकर सुर्वे, महेंद्र निगुडकर, मेघा परुळेकर, वर्षा लाड, संतोष दगडे, विश्वनाथ थोरवे, राजाभाऊ कोठारी, विष्णू साबळे आदी उपस्थित होते.