संबोध परीक्षा बक्षीस वितरण

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

रायगड गणित-विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या गणित संबोध परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ नांदगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरुड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी होते.

यावेळी नांदगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खोत, पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर, गणित अध्यापक मंडळाचे संदेश चोरघे, गणित संबोध परीक्षेच्या मुरुड तालुकाप्रमुख मीनल मोरे, शिक्षिका शुभांगी पंची, सुरेश मोरे, म्हात्रे, दत्तात्रय खुळपे, निशा बिरवाडकर, नियती ठमके आदी मान्यवर तसेच सहभागी शाळांचे विज्ञान-गणित शिक्षक उपस्थित होते. गट शिक्षण अधिकारी सुनील गवळी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच गणित संबोध परीक्षेचा सराव असणे खूप आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेतयशस्वी होण्यासाठी स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. लवकरच गणित विज्ञानाचे महामंडळ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version