ज्युनियर क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण

। पनवेल । क्रीडा प्रतिनिधी ।

पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्सच्या क्रीडांगणावर क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण यांनी आयोजित केलेल्या बारा व चौदा वर्षांखालील ज्युनियर वयोगटातील क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिसवितरणांचा कार्यक्रम रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बारा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, पाचुरी क्रिकेट अकॅडमी कामोठे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी सामनावीर पार्थ जंगम, फायटर ऑफ दि मॅच आर्यन कुमार, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आर्य म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज विघ्नेश पाटील, उत्कृष्ठ गोलंदाज द्रुव दिगंबर, मालिकावीर यजुर्वे घरत यांना सन्मानित करण्यात आले.

चौदा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम विजयी संघ बी.पी. पाटील क्रिकेट अकॅडमी खारघर, द्वितीय क्रमांक नक्षत्र क्रिकेट अकॅडमी डोंबिवली तर, अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून शाश्‍वत नाईक, फायटर ऑफ दि मॅच दक्ष माळी, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक विनीत डोळस, उत्कृष्ठ फलंदाज शाश्‍वत नाईक, उत्कृष्ठ गोलंदाज ओम पाटील, मालिकावीर करण कांबळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षिसवितरणाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, जिल्हा सदस्य जयंत नाईक, राजेश पाटील, अँड.पंकज पंडित, शंकर दळवी, क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण पनवेल शाखेचे प्रमुख के. सीताराम, अमोल गुंड, मुख्य प्रशिक्षक जयवंत पाटील, सागर घरत सह युवा खेळाडू व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version