रस्ता सुरक्षा अभियान निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

| शिहू | वार्ताहर |

रस्ता सुरक्षा हि आपल्या देशातील काळाची गरज आहे. दरवर्षी हजारो व्यक्ती रस्ता अपघातात मरण पावतात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी 1 ते 15 जानेवारी या काळात राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान देशभर राबविण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून महामार्ग पोलीस रायगड परीक्षेत्र आयोजित रस्ता सुरक्षा अभियान निबंध स्पर्धा नुकतीच माध्यमिक शाळा शिहू येथे संपन्न झाली. या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या 22 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या मध्ये प्रथम क्रमांक इयत्ता आठवीच्या भाविका चंद्रकांत म्हात्रे, द्वितीय क्रमांक इयत्ता दहावी साक्षी नितीन पाटील, तृतीय क्रमांक नववीच्या आर्या किरणकुमार पिंगळसकर या विद्यार्थिनींना महामार्ग पोलीस केंद्र वाकण पोलीस सब इन्स्पेक्टर मेघनाद नवले, पोलीस हवालदार विक्रम फडतरे, पोलीस हवालदार संदीप घासे, पोलीस नाईक मनोहर माळी, पोलीस कॉनस्टेबल रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

अल्पवयीन मुलांना रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही असे उपक्रम राबवत असल्याचे महामार्ग पोलीस केंद्र वाकणचे सब इन्स्पेक्टर मेघनाद नवले यांनी या वेळी बोलतांना सांगितले. या वेळी माध्यमिक शाळा शिहू च्या मुख्याध्यापिका स्नेहलता म्हात्रे, विजय पाटील, जनार्धन शेळके, मनीषा घासे, विजय सीताराम पाटील, प्रदीप दळवी, कमला ठाकूर इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version