गडब येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

। गडब । वार्ताहर ।

संस्कार शिक्षण संस्था संचालित संस्कार विद्यालय गडब येथे वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा अनेकविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव, वार्षिक बक्षिस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी केंद्रप्रमुख सुधाकर पिंगळे, संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर , ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या सरपंच मानसी पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील पी.वाय. पाटील, जगदीश पाटील, महेश पवार, लक्ष्मण कोठेकर, देविदास कोठेकर, संस्थेचे पदाधिकारी प्रथमेश मोकल, संदीप म्हात्रे, दिनेश म्हात्रे, विश्‍वनाथ पाटील, प्रभावती मोकल, विजया पाटील, मुख्याध्यापक चिंतामणी मोकल आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थाना मान्यवरांच्या हस्ते पारितोषके प्रदान केली. तसेच, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही सन्मान करण्यात आला. पाककला, संगीत खुर्ची व इतर स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या पालकांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version