रिस येथे पारितोषिक वितरण समारंभ

रिस | वार्ताहर |
सालाबादाप्रमाणे सरस्वती नवरात्र सांस्कृतीक कला क्रीडा मंडळ नवीन रीस, येथे चित्रकला, वकृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, बकेट बॉल, मेणबत्ती पेटवणे व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संदीप मुंढे, मनसे उपाध्यक्ष दीपक कांबळी, रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर , नवी मुंबईचे आर एस पी कमांडंट ऑफिसर विलास पाटील ,पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मनोज महाडिक , सेवानिवृत्त सदस्य मधुकर महाडिक, मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरे, अध्यक्ष विलास पुगावकर, सचिव डि.के.माळी, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. अनिल पाटील,सह कोषाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गेल्या बारा वर्षापासून मंडळाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय व इतर मंडळांनी आदर्श घेण्यासारखे आहे, शिस्तबद्ध नियोजन पाहून आम्हाला या मंडळाचा हेवा वाटतो असे मत व्यक्त करून कार्यकारिणीचा गौरव केला. सर्व मान्यवरांचे व स्पर्धेतील विजेत्यांना मंडळाकडून सन्मानचिन्ह व विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल पाटील व आभार प्रदर्शन श्री.चंद्रभान कानवडे यांनी केले व राष्ट्रगीताने समारंभाचा समारोप झाला.

Exit mobile version