रानभाज्यांपासून प्रक्रिया पदार्थ प्रशिक्षण

। तळा । वार्ताहर ।

तळा येथे कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग संस्था यांचे संयुक्त विद्यमाने कृषी प्रक्रिया शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जितेंद्र गोसावी यांनी शेतीशाळे विषयी प्रास्तविक केले यामध्ये त्यांनी शेतीशाळेची संकल्पना, उद्देश व आयोजीत सहा वर्गाचे नियोजन या विषयी माहिती सांगितली. तर आनंद कंबळे यांनी रानभाज्याचे आहारातील महत्व व त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म या विषयी विस्तृत माहिती दिली व सर्वांनी आपल्या आहारात रानभाज्यांचा ज्यास्तीत ज्यास्त समावेश केल्यास आपले आरोग्य उत्तम राहू शकते असे सांगितले.

तहसीलदार स्वाती पाटील यांनी सदर प्रशिक्षणाचा महिलांनी ज्यातीत ज्यास्त फायदा घ्यावा व लघु प्रक्रिया उदयोग सुरू करून आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन केले व असे उदयोग उभारणीसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत प्रक्रिया उदयोग उभारणीसाठी शासन मोठ्या प्रमाणात मदत करत असल्याचे सांगितले. या नंतर शेती शाळेमध्ये महिलांना रानभाज्यांपासून विविध प्रकारचे प्रक्रियुक्त पदार्थांचे कसे करावे याविषयी प्रशिक्षित करण्यात आले. या मध्ये सुरणापासून कटलेट तयार करणे, कर्टोलीपासून मंचुरियन बनवणे, रान भाजी नाचणीचे व तांदळाचे पीठ मिळून मोमोज तयार करणे, रानभाजी व नाचणी पासून अप्पे तयार करणे,कुड्याच्या शेंगांची भाजी,शेवग्याचा पाला टाकळा यांच्यापासून थालिपीठ बनवणे, विविध प्रकारच्या चटण्या पुदिना चटणी,शेजवान चटणी व ग्रेवी इत्यादींचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी तहसीलदार तळा स्वाती पाटील, तालुका कृषि अधिकारी आनंद कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, कृषी पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी , कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे, दिनेश चांदोरकर, सचिन लोखंडे व महिला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version