| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नारळी पौर्णिमा बुधवार, दि.30 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुळे यांच्या हस्ते दुपारी 3.30 वाजता नारळाची पूजा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संस्थापक तथा तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजयआण्णा साबळे, पोलीस कॉ. नाथा दहिफळे, रिक्षा चालक-मालक संघटना एसटी स्टँड माणगाव विभागीय अध्यक्ष संतोष सावंत, उपाध्यक्ष जमाल पिलपिले, लियाकतभाई रहाटविलकर,विशेष सल्लागार हुसेनभाई आकुस, नरेश सावंत, पांडुरंग गुजर, सेक्रेटरी निलेश आडीत, खजिनदार नंदू खरे, विलास वेदक आदींसह रिक्षा चालक-मालक संघटनेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेतर्फे गाडी सजवून नारळाची वाजत, गाजत, लेझीमच्या तालावर नाचत माणगाव बसस्थानक येथून मुंबई-गोवा महामार्गाने बाजारपेठ ते काळ नदी अशी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी माणगाव काळ नदीच्या पात्रात नारळाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले.