| कर्जत | वार्ताहर |
श्री राम जन्मभूमी अयोध्येतून आलेल्या पूजित अक्षत कलशाची कर्जतमध्ये शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्जतमधील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्त चार फाटा ते पोलीस मैदान बाईक रॅली आयोजीत केली होती. या रॅलीची श्री कपालेश्वर देवस्थान येथे सांगता झाली. यानंतर श्री कपालेश्वर मंदिर येथे अक्षत मंगल कलशाचे विधिवत पूजन श्री व सौ आशा वसंत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विनायक उपाध्ये, श्विशाल जोशी, केदार भडगावकर, कमलाकर किरडे, स्वप्नाली पाटील, दया हजारे, सचिन ठाकूर, अनंता हजारे, हर्षल पारखी, जिग्नेश शाह, अभिषेक तिवारी, मनीष सोनावळे, विवेक भागवत, पद्माकर गांगल आदीसह कर्जतकर मोठया संख्येने उपस्थित होते.
कर्जतमध्ये अक्षत कलशाची शोभायात्रा
