। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या वीस नवरत्नांचा तसेच पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करण्यात आला. सागम गेली 88 वर्षे विविध उपक्रम करीत असून यंदा प्रथमच मंडळाने हा उपक्रम केला आहे. कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने श्री कपालेश्वर मंदिरच्या सभागृहात स्टकर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी खुशी हजारे (बाल कलाकार), अमृता भगत (राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग खेळाडू), निलेश परदेशीं (आरोग्य सेवक), विजय मांडे (पत्रकारिता), सिद्धांत जोशी (गेमर), राजेश कोठारी (सार्वजनिक रक्तदाता), सागर सुर्वे (इतिहास अभ्यासक), क्रिशा जैन (महिला वैमानिक), संतोष दगडे (एव्हरेस्ट वीर), डॉ. अनिरुद्ध जोशी (आरोग्य), जुई गडकरी (प्रसिध्द अभिनेत्री), पराग बोरसे (जगप्रसिध्द चित्रकार), नितीन आरेकर (शिक्षण, निवेदक, लेखक), प्रसाद पाटील (भजन), महेश वैद्य (उद्योजक), श्रीराम पुरोहित (कीर्तनकार), जान्हवी मुळे (पत्रकारिता), गुरुनाथ साठेलकर (बचत कार्य), राहुल वैद्य (अभिनेता), विवेक भागवत (संगीत) या नवरत्नांचा तसेच दहिवली विचार मंच, नूतन गणेश मंडळ, ओंकार मित्र मंडळ, पाटीलआळी गणेशोत्सव मंडळ, वंदे मातरम मित्र मंडळ या संस्थांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गणेश प्रतिमा देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक निलेश हरिश्चंद्रे, मिलिंद चिखलकर, दिलीप गडकरी, विकास चित्ते, मंगला पुरोहित, मल्हारी माने, सुनील कदम, सदानंद मुळे, दिनेश कडू, वैदेही पुरोहित, दिनेश जैन, दीपा बोरसे, अभिजीत मराठे, सदानंद जोशी, अश्विनी बोरसे, प्रशांत पाटील, अमित मराठे, मंदार लेले, रौनक कोठारी, दीपक बडगुजर, मिलिंद खंडागळे, कौस्तुभ पराजपे, कल्पेश शाह, रघुनाथ खैरे, सर्वेश गोगटे आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.