| पनवेल | वार्ताहर |
दुचाकीची कारला ठोकर लागल्याने कारमधील तीन ते चार इसमांनी खाली उतरून दुचाकी चालकाला मारहाण करून त्याच्याजवळील 92 हजार रुपये आणि मोबाईल घेऊन चोरटे पळून गेले.
याप्रकरणी कारचालक आणि मारहाण केलेल्या इसमांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हकीकत अशी की, मोहम्मद मुनोवर नूर मोहम्मद सय्यद हा घोटगाव येथे राहत असून तो कुत्र्यांना जेवण वाटप करून येत असताना, तळोजा हायवे रोड धानसर ठाकूरपाडा येथे आला असता पेट्रोल पंपासमोर सफेद रंगाच्या कारला दुचाकीची ठोकर लागली. त्यामुळे तो खाली पडला. यावेळी कार मधून तीन ते चार इसम खाली उतरले व दमदाटी करून कारचे नुकसान झाले आहे असे बोलून भरपाई दे असे सांगत त्याच्याकडून 92 हजार रुपये आणि मोबाईल घेत पलायन केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.