| रत्नागिरी | प्रतिनिधी |
खेड येथे रविवारी (दि.29) आयोजित चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समर्पित पहिल्या कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. आशालता कांबळे यांची निवड करण्यात आली. प्रा. डॉ. आशालता कांबळे या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगावच्या असून मराठीतील फुले आंबेडकरी प्रेरणेने संविधान मूल्यांचे साहित्य लिहिणाऱ्या समीक्षक संशोधक व कवयित्री म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत 23 पुस्तके व ग्रंथांचे लेखन केले आहे. डॉ. आशालता कांबळे या फुले आंबेडकरी साहित्यिक, तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्त्या आणि निष्ठावान संशोधक व विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत.
अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे
