प्रा.डॉ. अनिल बांगर यांना समाज भूषण पुरस्कार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकण एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय पेझारी, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अनिल बळीराम बांगर यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वंजारी सेवा संघ, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने 1 जानेवारी रोजी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.

वंजारी सेवा संघ दशकपूर्ती सोहळा राज्यस्तरीय वंजारी समाज महामेळावा 1 जानेवारी रोजी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात बांगर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. प्रा.डॉ. बांगर हे मुंबई विद्यापीठ पीएच.डी मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version