। नागोठणे । वार्ताहर ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश गुरव यांना नाशिक येथील सपकाळ नॉलेज सिटी येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2021-22 चा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सपकाळ नॉलेज सिटी चे प्रमुख रवींद्र सपकाळ, तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख यशवंत शितोळे, डॉ. गुरव यांच्या सौभाग्यवती साधना संदेश गुरव आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्षा नंदा देशमुख, कार्यवाह अॅड. सिद्धार्थ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र जैन, अनिल काळे, अब्बास नागोठणेवाला, गु.रा. अग्रवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के. पाटील, महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक तथा रोहा तालुका करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. विलास जाधवर, अंतर्गत मूल्यमापन कक्ष प्रमुख प्रा. डॉ.दिनेश भगत आदींसह इतर सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






