। चिरनेर । वार्ताहर ।
कोरोनात संपूर्ण देश हादरला असताना महामारीला थोपविण्याचे काम केंद्राचे पुरेसे आर्थिक पाठबळ नसताना उत्तमपणे होताना दिसत आहे. देशात लाखांनी कंपन्या बंद पडल्या आहेत. प्रत्येकाला रोजंदारी नाही. त्या चालू करण्यासाठी आघाडी सरकारची धाडसी धडपड सुरु आहे.
राज्यातील दंगेे, अत्याचार मानवतावादी दृष्टिने थांबविण्याचे काम ठाकरेंचे आघाडी सरकार करीत आहे. याबाबत सर्व धर्मियांमध्ये आघाडी सरकारवर विश्वास वाढला आहे. हाच विषय घेऊन सुप्रसिद्ध कवी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील म्हणतात, मी आघाडीतील तिन्ही पक्षांतला साधा सदस्य नसताना उध्दव ठाकरेंच्या आघाडी सरकारच्या मानवतावादी विचारानेच अभिमानाने माझ्याकडून हे माझे गाणे सोशल मीडियासाठी दोन-तीन दिवसात अर्पण केले जाणार आहे.
आयं, तुजा उध्दव ,पयला नंबर देशान हे गाणं सुरेल करण्यासाठी स्वररंगचे पंडित गणेश बंडा आणि दिल्लीत राष्ट्रीय चित्ररथ सादरीकरणात यशस्वी झालेले रुद्राक्षचे नितीन पाटील यांच्या ग्रुपचे नृत्य सादरीकरण साह्यभूत ठरले आहे. विशेष म्हणजे हे गाणे आगरीकोळी बोलीभाषेत आहे.