। रसायनी । वार्ताहर ।
पुणे येथील साने गुरुजी स्मरकातील मध्यवर्ती कार्यालयात अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची वार्षिक सर्वसाधारण संपन्न झाली. यावेळेस नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबादारी रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील पिल्ले महाविद्यालयाचे माजी प्रा. रमेश पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मुलभूत अधिकार असताना सरकार शिक्षणणाचे खाजगीकरण करू पाहत आहे. शिक्षणाच्या या खाजगिकरणाला विरोध करून शून्य ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला के.जी. ते पी.जी. पर्यंत मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या मागणीसाठी काम करणार्या अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील प्राध्यापक रमेश भालचंद्र पाटील उर्फ आर.बी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे या निवडीबद्दल रायगडसह महाराष्ट्रातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.