दारूबंदी अधिकार्‍याचा दारू पिऊन मृत्यू

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यामधील दारूबंदी कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकार्‍याचा अति दारू सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जास्त प्रमाणात दारू सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला असून, ही घटना शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता महाड ग्रामीण रुग्णालयात घडली आहे.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय, महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते. यांना दारू पिण्याची सवय होती. बुधवारी जास्त प्रमाणात दारू सेवन केल्याने त्यांचा महाड ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. दारूबंदी अधिकार्‍याचा दारू पिऊन मृत्यू झाल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा करण्यात येत आहेत. महाड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कापडेकर करत आहेत.

Exit mobile version