मत्स्य व्यवसायातर्फे उपजीविका उपक्रम

| अलिबाग | वार्ताहर |

कांदळवन कक्ष, रायगड-अलिबाग यांच्याकडून युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ग्रीन क्लायमेट फंड सहाय्यित Enhancing Climate Resilience in Coastal areas of India हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत उपजीविकाविषयक सी विड फार्मिंग, मासे मूल्यवर्धित उत्पादने, मत्स्य खाद्य उत्पादन घटक आणि मासे वाळवणी / धुरळणी केंद्र हे उपक्रम (प्रकल्प) राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व अलिबाग हे तालुके असणार आहेत. वरील उपजीविका विषयक उपक्रम माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग अथवा कांदळवन कक्ष, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:-
श्री. म. वि. नांदोस्कर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी-अलिबाग. भ्रमणध्वनी क्रमांक 8007523505
श्री. दशरथ शिरसाट, जिल्हा समन्वय अधिकारी-रायगड, भ्रमणध्वनी क्रमांक 7507437931.
कार्यालयाचा पत्ता:- मत्स्यव्यवसाय विभाग तिसरा मजला, सिद्धी अपार्टमेंट, डॉ. पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग पेण रोड, अलिबाग. पिन कोड 402201. ई-मेल आयडी acfalibaggmail.com

कांदळवन कक्ष, अलिबाग कार्यालयाचा पत्ता- वन परीक्षेत्र अधिकारी-अलिबाग, अलिबाग रेवस रोड, खडतल पुलाजवळ, बामणोली-अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग, संजय पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version