| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील चिखली हायस्कूलला सोमवारी (दि.05) माजी विद्यार्थी एसएससी बॅच 1974 जुनी अकरावी यांजकडून शाळेस प्रोजेक्टर भेट देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अनिल ठाकूर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. शाळेचे जाधव यांनी प्रास्ताविक करताना माजी विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मोहन पाटील, अनिल पाटील, काशिनाथ पाटील, अनिल ठाकूर यांनी शालेय जीवनाविषयी आनंदी क्षण सांगून शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका ठाकुर, हरिभाऊ पाटील, काशिनाथ पाटील, मोहन पाटील, कमलाकर पाटील, अनिल ठाकूर, चंद्रकांत देशमुख, अनिल पाटील, विश्वास शेळके, गणपत मेंगाल, विलास म्हात्रे, महेश खरंसबले माजी विद्यार्थी उपस्थित होते.