पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलातील चार पोलीस कर्मचार्यांची बढती करण्यात आली आहे. त्यात दोन हवालदारांना सहाय्यक फौजदार व दोन पोलीस कर्मचार्यांना हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.5) बढती पदक बहाल करण्यात आले.
रायगड पोलीस दलातील पोलीस हवालदार दिनेश रामनाथ पिंपळे हे श्रीवर्धन तालुक्यातील कुडगांव येथील आहेत. 1995 मध्ये ते रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रूजू झाले. सुरुवातीला पोलीस मुख्यालय, मुरूड, अलिबाग, पेेण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे त्यांनी सेवा केली असून सध्या रेवदंडा पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. पोलीस खात्यात त्यांनी आतापर्यंत तीस वर्षे सेवा केली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलीस हवालदार इकबाल अत्तार यांचीदेखील सहाय्यक फौजदार म्हणून बढती करण्यात आली आहे. रायगड अंगूली मुद्रा कक्षातील पोलीस नाईक उमेश शिंदे, बोरघाट येथील वाहतूक महामार्ग केंद्रातील पोलीस नाईक अशिष ठाकूर यांची पोलीस खात्यामध्ये दहा वर्षाहून अधिक सेवा झाली आहे. त्यांना पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार म्हणून बढती मिळाली आहे.







