। कोलाड । प्रतिनिधी ।
32 रायगड-रत्नागिरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे विक्रमी मतांनी विजय होण्यासाठी रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येथील गावागावात जाऊन मतदारांची भेट घेत प्रचारात आघाडी घेत आहेत. तसेच आंबेवाडी-खांब जिल्हा परिषद मतदार गणातून अनंत गीते यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एक संयमी, अभ्यासू व शांत स्वभावाचे नेतृत्व व एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला कणखर उमेदवार म्हणजे अनंत गीते म्हणून त्यांची ख्याती असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शेकाप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस सह महाविकास आघाडीतील सामजिक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे गाव गावात जाऊन दौरे करीत आहेत. तसेच, मतदारांजवळ संपर्क करीत उमेदवार गिते यांची ताकद आधिक बळकट करत असताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गट, बीजेपी, शिवसेना शिंदे गट आदी महायुतीचे अधिकृत उमेदवार तटकरे यांना पराभूत करण्यासाठी भयानक उष्णतेची लाट आहे. तरी देखील त्याची तमा न बाळगता गद्दारी विरुद्धची हि लढाई जिंकण्यासाठी तसेच देशाचे संविधान वाचविण्यासाठी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या विजयासाठी यावेळी मतदारांशी गावोगावी प्रचार करत आहेत. मतदार तसेच आबालवृद्ध यांची भेट घेत गद्दारी विरुद्ध आवाज उठवून आणि अनंत गीते यांना शंभर टक्के मतदान करून निवडून देऊन भरघोस मतांनी निवडून देत लोकसभेत पाठविण्यासाठी ऐकटवले आहेत. रायगडच्या राजधानीत नावीन्य पूर्ण विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थीत दर्शवित प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.
रायगड जिल्हासह कोकणात महाविकास आघाडीच्या प्रचार सभा घेतल्याने वातावरण आघाडीचे झाले आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रचारासाठी उतरले आहेत. एकत्र एक दिलाने काम करीत असल्याचे चित्र या निवडणुकीत सर्वत्र पाहावयास मिळत आहे. यावेळेस अनंत गीते यांचा प्रचंड मतांनी विजय सुनिश्चित असल्याचे प्रचार दरम्यान शेकापचे नेते शिवराम महाबले आणि उबाठाचे शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे यांनी व्यक्त केले आहे.
अनंत गीतेंचा गावागावतून प्रचार
