। म्हसळा । वार्ताहर ।
मंगळवारी (दि.7) संपन्न होणार्या रायगड लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्या तालुक्यातून येणार्या आणि म्हसळा तालुक्यातून इतर तालुक्यात जाणार्या निवडणूक कर्मचार्यांसाठी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घारे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे, अशी माहिती तहसीलदार समीर घारे यांनी कृषीवलला दिली.
कुठल्याही निवडणूक अधिकारी, कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. दिव्यांगासाठी व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मेडिकल किट, ओआरएस, सेल्फी पॉईंट, गाडी पार्किंग, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, आसन व्यवस्था इत्यादी सोयीसुविधा देण्यात येणार असल्याचेही घारे यांनी सांगितले. या कामासाठी मंडळ अधिकारी सलीम शहा, तलाठी मयूर ठाकरे, अजय जाधव, शैला गवळी, शेखर सोनवणे, प्रकाश उघडे, हेमंत मोरे, आशिष पवार, सर्व कोतवाल, महसूल कर्मचार्यांनी सहकार्य केल्याचेही घारे यांनी सांगितले.