| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल येथे राहणारे गोपालकृष्ण कोडला (59) हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी परदेशातील न्यूयॉर्क या ठिकाणी गेले होते. त्यादरम्यान अज्ञात व्यक्तीने कोडला हे राहत असलेल्या क्रिस्टल अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटचा मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश केला व घरातून 1 लाख 90 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे कर्णफुल, चांदीचे पूजेचे ताट, चांदीचा तांब्या, चांदीचा चमचा असा 2 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. कोडला हे घरी परत आल्यावर त्यांना मुख्य दरवाजाचे लॅच तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
घरफोडीत लाखोंचा ऐवज चोरीला
