पोलीस निरीक्षकाकडे साडेतीन कोटींची मालमत्ता

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

चार लाखाची लाच स्वीकारताना सापडलेल्या नवी मुंबईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची संपत्ती उत्पन्नापेक्षा तब्बल 297 टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेताना लाचलूचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे साडेतीन कोटींची मालमत्ता समोर आली असून उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी पदभार स्वीकारताच सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लाचखोरी बंद करण्याचे निर्देश दिले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडून एन.आर.आय. पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याला 4 लाख रुपयांची लाच स्व्वीकारताना अटक करण्यात आली होती. सतीश कदम यांच्या मागील 11 वर्षाच्या काळातील आर्थिक चौकशीमध्ये उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली असून ती बाजारमूल्य 3 कोटी 48 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.

Exit mobile version