वेश्याव्यवसाय करणार्‍या तीन महिलांवर गुन्हा

| पनवेल | वार्ताहर |

आफ्रिकन महिलांमार्फत चालवल्या जाणार्‍या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन महिलांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

खारघर सेक्टर 12 ई येथील रो हाऊसमध्ये आफ्रिकन महिलांमार्फत वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती हवालदार विनय तळभंडारे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांनी नेमलेल्या पथकाने बनावट ग्राहक पाठवले होते. या बनावट ग्राहकाने त्याठिकाणी जाऊन खात्री केली असता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एक आफ्रिकन महिला पोलिसांना चकमा देऊन पळून गेली, तर दोन महिला हाती लागल्या. त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आफ्रिकन महिलांनी राहण्यासाठी रो हाऊस भाड्याने घेऊन त्यामध्येच वेश्याव्यवसाय सुरू केला होता.

Exit mobile version