तीन हजार अंड्यांचे संरक्षण

| दापोली । वृत्तसंस्था ।
दापोली तालुक्यातील यावर्षी दोन हजार 826 अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. सात गावांमध्ये 27 घरटी सात संरक्षण कक्षांमध्ये ठेवण्यात आली असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. सागरी कासव संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत दापोलीतील समुद्र किनार्‍यांवर सात कक्षांमधील घरट्यांमध्ये दोन हजार 826 अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे.

हिवाळ्यात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव मादी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात. यावर्षी सागरी कासवांनी दापोलीतील आंजर्ले येथे चार, केळशी दोन, कर्दे एक, मुरूड दोन, दाभोळ आठ, कोळथरे आठ, लाडघर दोन अशी एकूण 27 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. समुद्रकिनार्‍यावर वनविभागांतर्गत कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी दाभोळ व कोळथरे किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात कासवांनी घरटी सापडल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट आहे.

Exit mobile version